नमस्कार मंडळी,

आपली सहल आनंदी वातावरणात पूर्ण व्हावी या हेतूने काही नियम अटी खाली देत आहोत. सहलीला जाण्यापूर्वी आपण हे पूर्ण वाचून आपल्याला या नियम अटी आपणास मान्य आहेत गृहीत धरून आम्ही आपले सहलीला बुकिंग स्वीकारत आहोत. आपली गैरसोय आथवा गैरसमज होऊ नये तसेच सहलीत कोणताही वाद किंवा विसंवाद होऊ नये या करीता आपल्याशी साधलेला हा सुसंवाद आहे.आपण सहकार्य करालच याची आम्हाला खात्री आहे.

धन्यवाद

नियम अटी

*सहल बुकिंग करताना आपण खालील प्रमाणे रक्कम भरावी.

सहलीचे बुकिंग करतेवेळी प्रत्येकी ५०००/- अधिक GST तसेच विमान / रेल्वे भाडे फरक AC साठी अथवा इतर भरावा

उर्वरित रक्कम  सहल निघण्यापूर्वी ३० दिवस अगोदर ऑफिस मध्ये जमा करावी.

*सहल खर्चाची रक्कम रोख / चेक ने कल्पतरू हॉलीडेजच्या ऑफिस मध्ये आथवा खालील पैकी बँक खात्यामध्ये जमा                 करून त्याची सुचना ९४२०८६४२४१ ह्या नंबर वर द्यावी भरलेल्या स्लीप चा फोटो सदर नंबर वर पाठवावा.

AC NAME : KALPATARU HOLIDAYS

   BANK:                                            BRANCH :                           AC NO. :                                         IFSC CODE :

   BANK:                                            BRANCH :                           AC NO. :                                         IFSC CODE :

*सहल व्यवस्था :

) सहल उत्तम होण्यासाठी आमचे अनुभवी सेवाभावी असे सहल व्यवस्थापक सेवक वर्ग सहलीला बरोबर असतात. आवश्यक अशा ठिकाणी तेथील गाईड घेतले जातात. मर्यादित पर्यटकांचा ग्रुप असल्यामुळे सर्वांकडे व्यक्तिगत लक्ष दिले जाते.

) कंपनी तर्फे सामान वाहतुकीची व्यवस्था असते. जाताना ज्या रेल्वे स्टेशनला आपण उतरणार तेथे सुरु होऊन येताना आपल्याला रेल्वे मधील आपल्या जागेवर समान आणून दिले जाते. जाताना आपण आपल्या जागेवर जाऊन बसावे तसेच इच्छित स्थळी रेल्वे पोचल्यावर आपण आपले सामान उतरवून घेणे आवश्यक आहे.

प्रवासामध्ये प्रत्येकी सुटकेस छोटी बॅग घ्यावी.त्यासाठी कंपनीचा टॅग दिला जातो.त्याच सामानाची वाहतूक कंपनी मार्फत केली जाईल. प्रवास काळात खरेदीमुळे वाढलेल्या सामानाची वाहतूक ज्याची त्याने करायची आहे ह्याची नोंद घ्यावी.

सामानाची वाहतूक हि आपल्याला मदत म्हणून केली जाते. सामानाची जबाबदारी हि आपलीच असणार आहे. हॉटेल आथवा बस प्रवासात आपले लगेज गहाळ झाल्यास रु.१०००/- नुकसान भरपाई म्हणून दिले जातील. याव्यतिरिक्त इतर कोणतीही नुकसानभरपाई रोख अथवा वस्तू रुपात दिली जाणार नाही. अर्थात असे प्रसंग अपवादानेच घडतात.

) सहलीपूर्वी १५ दिवस अगोदर आपणांस प्रयाणपूर्व पत्रक  देण्याची व्यवस्था केली जाते. त्या मध्ये आपण कोठून प्रवास सुरु करणार आहोत,प्रवासाची तयारी इत्यादी माहिती दिलेली असते.

) सहल खर्चाव्यतिरिक्त इतर खर्चवैयक्तिक करावा लागणारा खर्च, रेल्वे प्रवासातील चहा, नास्ता, भोजन, स्थानिक प्रवेश फी, राफ्टींग, रोप वे, धार्मिक विधी तसेच ज्या ठिकाणी आपली बस पोहोचत नाही अशा ठिकाणी करावी लागणारी रिक्शा / जीप तसेच नेपाळ मध्ये एव्हरेस्ट दर्शनासाठी असणारे विमान तिकिटाचा खर्च तसेच प्रवास काळात खरेदीमुळे वाढलेले लगेज वाहतुकीचा खर्च हा ज्याचा त्याने करावयाचा आहे.

) जातीय, प्रांतीय, स्थानिक दंगली, नैसर्गिक आपत्ती यांमुळे किंवा अपरिहार्य कारणांमुळे ठरवलेल्या कार्यक्रमात बदल करणे, कार्यक्रम रद्द करणे, अथवा सहलच रद्द करणे क्रमप्राप्त झाल्यास तसे करण्याचे हक्क कंपनीने आपल्याकडे राखून ठेवले आहेत. अर्थात असे प्रसंग अपवादात्मकच असतात.

) आमच्याबरोबर प्रवास करणाऱ्या यात्री सभासदांची प्रवास काळातील जीवित वित्तीय हानीची जबाबदारी ज्याची त्याच्यावर आहे.

) कल्पतरू हॉलीडेजचे मुख्य कार्यालय चिंचवड येथे असल्यामुळे कंपनी बरोबर झालेले सर्व व्यवहार कायदेशीररीत्या चिंचवड येथेच झाले असे समजण्यात येतील. सर्व प्रकारचे कायदेशीर वाद हे फक्त पुणे न्यायक्षेत्राच्या आधीन आहेत.

) प्रवास काळात किरकोळ आजारपण आल्यास त्याबाबत प्राथमिक वैद्यकीय मदतीची व्यवस्था कंपनी मार्फत विनामूल्य केली जाईल परंतु आजाराचे स्वरूप तीव्र असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यवस्था केली जाईल परंतु आशा वेळी लागणारा खर्च हा ज्याचा त्याने करावयाचा आहे.

) (LTC) सर्टिफिकेट : ज्या सभासदांना LTC सर्टिफिकेट हवे असेल त्यांना सहलीनंतर ते देण्याची व्यवस्था होईल.

१०) एखाद्या सहलीस अपेक्षित प्रतिसाद जर मिळाला नाही तर आम्ही सहल नेणार आहोत किंवा नाही याची कल्पना आपणांस किमान १५ दिवस अगोदर आमच्याकडून दिली जाते. अशा वेळेस आपल्या इतर (विमान / रेल्वे) स्वरूपाच्या नुकसानीची जबाबदारी आमच्यावर रहाणार नाही.

११) सहल ठराविक दिवसात पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व ते प्रयत्न केले जातात. परंतु प्रयत्न करूनही दिवसांमध्ये वाढ झाल्यास आपल्या पर्यायी व्यवस्थेसाठी प्रती दिवशी प्रती व्यक्तीस रु.३५००/- किंवा पर्यायी व्यवस्थेनुसार होणारी जादा रक्कम द्यावी लागेल याची कृपया नोंद घ्यावी.

१२) सहलीतील सर्व व्यवस्था ( बस प्रवास, निवास, भोजन ) स्थानिक उपलब्ध व्यवस्थेनुसार बुक केले जातात. अशा व्यवस्था स्वीकारण्यावाचून कंपनीसमोर कोणताही पर्याय नसतो. त्याबाबत कंपनी पूर्ण परावलंबी असते. त्यामुळे कोण्यात्याही तांत्रिक कारणामुळे ऐनवेळी गैरसोय झाल्यास त्याला कंपनी जबाबदार असणार नाही. अथवा त्याबाबत कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.

रेल्वे प्रवासाविषयी अत्यंत महत्वाचे

सहल खर्चात रेल्वे प्रवासाचे ( स्लीपर क्लास ) भाडे समाविष्ट केले आहे. ज्या सभासदाना AC क्लासने प्रवास करावयाचा आहे त्यांच्याकडून AC क्लास फरकाची रक्कम आगाऊ घेतली जाईल. तत्काळ तिकीट AC क्लास ची तिकिटे काढण्यासाठी लागणारे सर्व्हिस चार्जेसची माहिती आधी घ्यावी हि विनंती नंतर तक्रार नको.

आपल्याला हव्या त्या क्लासची तिकिटे काढण्याचा आमचा प्रयत्न असतो. आपण १२० दिवस अगोदर बुकिंग केले असले तरी आपण सांगितलेल्या क्लासची तिकिटे होतीलच याची खात्री देता येत नाही. तसेच तिकिटांसंबधी कोणत्याही अटी चालणार नाहीत कारण त्याचा उपयोग होईलच असे नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्याला संपर्क करता येत नाही तेंव्हा आपली परवानगी गृहीत धरून मिळालेल्या तीकीटावरच आपल्याला प्रवास करावा लागेल. जर आपण तिकीट काढणार असाल तर आपण रेल्वे नंबर / दिनांक इत्यादी माहिती कार्यालयातून घेऊ शकता ती आम्ही आनंदाने देऊ.

विमान प्रवासाविषयी अत्यंत महत्वाचे

भारतातील निरनिराळ्या विमान कंपन्या लोकांना आकर्षित करण्यासाठी अनेक स्कीम बाजारात आणतात. दोन महिने अगोदर बुकिंग केल्यास कमी दारात तिकिटे मिळतात. ती तिकिटे बुकिंग करताना त्याची रिफंड पॉलिसि तपासून घ्यावी कारण अशी तिकिटे रद्द केल्यास फारच कमी रक्कम परत मिळते.

कोणत्याही कारणाने आमच्याकडून जर सहल रद्द झाल्यास त्या सहलीमध्ये आपण विमान तिकीट काढले असल्यास आपल्या समोर स्वतंत्र जाण्याचा मार्ग असतो त्यासाठी आम्ही आपल्याला सहलीचे नियोजन करून देऊ. परंतु विमान तिकिटाच्या कॅन्सलेशन पोटी होणार्या आर्थिक नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही आथवा कोणती रक्कम दिली जाणार नाही ह्याची नोंद घ्यावी

सहलीतील बस प्रवासाविषयी अत्यंत महत्वाचे

. सर्व सहलींकरता पुश बॅक / हाय बॅक सीट्स असणारी बसची व्यवस्था केलीली असते.

. ज्या सहलींमध्ये AC बसची व्यवस्था असते त्याबाबतची माहिती माहितीपत्रकात तसेच बुकिंग करते वेळी दिलेली असते. डोंगराळ / पहाडी भागात AC चालवला जात नाही. प्रवासकाळात सदर बसमध्ये AC बिघाड झाल्यास पर्यायी वाहनाचा आपल्याला स्वीकार करावा लागेल. ( नॉनAC असेल तरीही )कारण सभासदांचे स्थलदर्शन होणे महत्वाचे असते. त्यामुळे इच्छित स्थळी वेळेत पोहचणे महत्वाचे असते. त्यामुळे जी व्यवस्था सहल व्यवस्थापक करतील ती स्वीकारावी लागेल.

. बस मधील आसन व्यवस्था बुकिंग करतेवेळी माहित करून घ्यावी. सहल कालावधी मध्ये व्यवस्थापकास पुढे सीट देण्यासठी आग्रह / दबाव टाकू नये. जी जागा आपल्याला दिली असेल ती शेवट पर्यत आपल्यासाठी राखीव असेल. रोटेशन पद्धत असणार नाही.

. जाहीर झालेल्या सहलीला जसा प्रतिसाद असेल त्याप्रमाणे तेथील बस ची व्यवस्था असेल. कमी प्रतिसाद असेल तर तशी वाहन व्यवस्था असेल. सहल रद्द होऊन इतर प्रवाशांचा हिरमोड होऊ नये हा उद्देश.

. जी ठिकाणे पायी जाऊन पहाण्यासारखी असतील ती पायी जाऊन पहावी लागतील. ज्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था असेल      ( रिक्षा / सायकल रिक्षा इत्यादी ) त्याचा खर्च आपणास करावा लागेल

भोजन व्यवस्था

सहल कालावधीमध्ये सकाळी ते वाजता चहा अथवा कॉफी, ते च्या दरम्यान ब्रेकफास्ट दुपारी १२:३० ते :३० या वेळेत लंच दुपारी 4 वाजता चहा अथवा कॉफी रात्री :३० च्या दरम्यान रात्रीचे जेवण दिले जाते. या वेळेमध्ये सहल कार्यक्रमानुसार बदल होऊ शकतो.

सहलीतील भोजन व्यवस्था रेल्वे विमान प्रवासाचे दिवस वगाळता असते. परतीचा प्रवास सकाळच्या कालावधीत सुरु होत असेल ( ते १२ ) तर सदर व्यवस्था सकाळी नाष्ट्या पर्यंतच असेल. रेल्वे किंवा विमान प्रवासात आम्हाला पार्सल द्या वैगरे अशी गळ घालू नये. तशी व्यवस्था करणे शक्य नसते. प्रवासाच्या सुरवातीला सदर रेल्वे रात्री नंतर पोचणार असतील तर त्यादिवशीचे भोजन सभासदांनी रेल्वे प्रवासात करून घ्यायचे आहे.

संकष्टी / आषाढी / कार्तिकी / एकादशी / महाशिवरात्र / दत्तजयंती या दिवशीच उपासाच्या पदार्थांची व्यवस्था असेल.

सहल सभासदांची संख्या १५ पेक्षा कमी असल्यास संपूर्ण भोजन व्यवस्था स्थानिक हॉटेल / रेस्टोरंट मध्ये केली जाईल

सहल व्यवस्थापक आपणास त्या त्या वेळी त्याबद्दल माहिती देतीलच.

निवास व्यवस्था

आमच्या सर्व सहलीत जी हॉटेल्स देतो ती सर्व दृष्टीने परिपूर्ण AC / NON AC असतात. ज्या ठिकाणी नॉन AC रूम असतात त्या ठिकाणी आपल्याला AC रूम हवी असल्यास त्यासाठीचा जादा आकार आपल्याला देणे बंधनकारक आहे. ग्रुप टूर साठी हॉटेल्स निवडताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो.

हॉटेल मध्ये एक्स्ट्रा बेड देण्याची व्यवस्था असते जे एका रूम मध्ये तिघे सभासद असतील त्यांना एक्स्ट्रा बेड देण्यात येईल. परंतु बर्याच हॉटेल्स मध्ये बेड हा खाली जमिनीवर टाकून दिला जातो.

जे सभासद एकटे प्रवास करत असतील त्यांना स्वतंत्र वेगळी रूम हवी असल्यास सहल खर्चा व्यतिरिक्त ४०% रक्कम जादा भरावी लागेल. तसेच जर दुसरा सभासद मिळाला नाही तरी आपणांस ४०% रक्कम जादा भरावी लागेल.

हॉटेल मुक्कामात आपण हॉटेल व्यवस्थापनाकडून व्यक्तिगत स्वरूपात काही सेवा / अथवा पदार्थ घेतल्यास अशा स्वरूपाचा खर्च आपण करावयाचा आहे.

रूम स्वच्छ होण्याच्या दृष्टीने रूमची चावी प्रत्येक वेळेस हॉटेल वर जमा करणे गरजेचे आहे.त्याचप्रमाणे तसे करताना आपण आपल्या सामानाची काळजी घेणे गरजेचे आहे जसे कि किंमती वस्तू बाहेर जाताना आपल्या बरोबर घेणे सोयीचे असते. सदर काळात एखादी वस्तू गहाळ झाल्यास त्याची जबाबदारी हॉटेल व्यवस्थापन घेत नाही. तसेच सहल व्यवस्थापक त्यास जबाबदार असणार नाही किंवा कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही. ह्याची नोंद घ्यावी.

बुकिंग कॅन्सलेशन रिफंड

अॅडव्हांस म्हणून प्रत्येकी ५०००/- घेतले जातात. जर काही कारणाने आपले येणे रहित झाले तर आपल्याला सदर रक्कम परत केली जात नाही. जर आपण सहल खर्चाची उर्वरित रक्कम भरली असेल तर खालील प्रमाणे आपली रक्कम परत केली जाईल.

रिफंड सहल निघण्याच्या तारखेपासून

दिवस अगोदरपर्यंत        वजा रक्कम        रिफंड रक्कम

८९ ते ६०                १०%             ९०%

५९ ते ३०                ३०%             ७०%

२९ ते १०                ६०%             ४०%

  ते                 ८०%             २०%

  ते                 ९५%             %

सहल निघण्याच्या आधी दिवस आधी अथवा त्याच दिवशी रिफंड मिळणार नाही. आपण बदली सभासद देऊ शकता परंतु रेल्वे प्रवासात होणारा दंड किंवा विमान प्रवासाचे त्या दिवशीचे भाडे हे आपल्याला द्यावे लागेल. रिफंड रक्कम आपल्याला चेकनेच दिली जाईल.

आपण सहल बुकिंग करताना आपण सर्व नियम वाचले आहेत अथवा आपल्याला त्याची माहिती आहे हे गृहीत धरूनच बुकिंग घेतले जाते.

धन्यवाद.