गुजरात सहल
गुजरात हे असे एक राज्य आहे जे पौराणिक, धार्मिक,एैतिहासिक, भौगोलिकदृष्ट्या आणि आता औद्योगिकदृष्ट्या देखील उदयास येणारे असे राज्य आहे. ह्याचा उल्लेख पुराणात आहेच. सप्तपुरी आणि चारधामं पैकी एक असे द्वारका, बारा ज्योतिर्लिंगांपैकी सोमनाथ आहेच तसेच शक्तीपीठ आणि अनेक धार्मिक ठिकाणे आहेत. एैतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या व पर्यटनासाठी गुजरात हे अत्यंत सुंदर राज्य आहे. ह्या सहली मध्ये आपण धार्मिक ठिकाणाबरोबर एैतिहासिक स्थळांना देखील भेट देतो. तसेच जगातील सर्वात उंच अशी ख्याती असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला देखील भेट देतो.
गुजरात सहल – १२ दिवस
Place to visit
Inclusion-Exclusion
Cancellation & Cost
Place to visit
सहलीतील प्रेक्षणीय स्थळे
-
गरुडेश्वर – श्री दत्तात्रयांचे मंदिर, श्री टेंबे स्वामी मंदिर, नर्मदा दर्शन
-
सरदार सरोवर – स्टॅच्यू ऑफ युनिटी
-
पावागड – श्री महाकाली मंदिर ५१ शक्तीपीठांपैकी एक ( रोप वे )
-
बडोदा – गायकवाड संस्थानची राजधानी
-
आनंद – अमूल दुध उत्पादन केंद्र ( वेळ आणि परवानगीनुसार )
-
जुनागड – इतिहासातील महत्वाचे गाव
-
गिरनार – श्री दत्तात्रयांचे पादुका दर्शन ( रोप वे + चालणे )
-
सासनगिर – अभयारण्य सिंह दर्शनासाठी प्रसिद्ध
-
प्रभासपातण – हिरण्य – कपिला – सरस्वती या नदींचा त्रिवेणी संगम
-
भल्लकतीर्थ – महाभारतातील महत्वाचे ठिकाण
-
देहोत्सर्ग – भगवान श्रीकृष्णांनी आपला देह त्यागाला ते ठिकाण
-
सोमनाथ – बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग
-
पोरबंदर – सुदामाचे गाव, कीर्ती मंदिर – महात्मा गांधींचे जन्मठीकाण
-
द्वारका – सप्तपुरी आणि चारधामांपैकी एक श्री द्वारकाधीश मंदिर
-
बेट द्वारका – भगवान श्रीकृष्णांचे निवासस्थान
-
डाकोर – भगवान श्रीकृष्णांचे प्रसिद्ध मंदिर
-
अहमदाबाद – साबरमती आश्रम, श्री वैष्णोदेवी मंदिर, अक्षरधाम
Inclusion-Exclusion
समावेश
1. जाता येतानाची सेकंड क्लासचे रेल्वे तिकिट भाडे.*
2. डिलक्स हॉटेल मध्ये स्वतंत्र रूम ( दोघात एक प्रमाणे )
3. रूम मध्ये तिसरा सभासद प्रौढ / मुल असल्यास लागणारा अतिरिक्त बेड हा ज्या प्रमाणे सहल खर्च दिला असेल त्या प्रमाणे
4. 2 X 2 AC अथवा NON AC बसने स्थलदर्शन
5. भोजन व्यवस्था सहलीच्या कार्यक्रमानुसार सहल खर्चामध्ये समाविष्ट
6. ग्रुप लीडर तसेच महत्वाचे ठिकाणी गाईड खर्च समाविष्ट
7. पुणे / मुंबई येथून जाताना अथवा येताना वगळता हमाली खर्च
वगळण्यात आलेल्या गोष्टी
१ विमान प्रवास भाडे तसेच रेल्वे / विमान प्रवासादरम्यान लागणार भोजन खर्च
2. पर्यायी पर्यटन स्थळे
3. प्रवेश शुल्क तसेच तेथील बोटिंग खर्च अथवा आपल्या सोयीसाठी केलेल्या रिक्षा अथवा तत्सम वाहनाचा खर्च
4. रेल्वे प्रवासातील वरील वर्गाची तिकिटे हवी असल्यास अथवा हॉटेल मध्ये रूम अपग्रेड घेतल्यास येणार खर्च
5. विमा खर्च समाविष्ट नाही
6. शासकीय यंत्रणेकडून लागू झालेले नवे कर
तसेच सहलीत सहभागी होण्यापूर्वी आपण संपूर्ण नियम व अटी वाचूनच बुकिंग केले आहे व ते आपणास मान्य आहेत असे समजण्यात येईल. आपण देखील पूर्ण माहिती घेऊनच बुकिंग करावे हि नम्र विनंती. जेणे करून नंतर गैरसमज राहू नयेत व सहल / यात्रेचा आनंद घेता यावा हाच त्यामागील मुख्य हेतू.
Cancellation & Cost
Days upto |
Cancellation |
Refund |
---|---|---|
89 to 60 days |
10% |
90% |
59 to 30 days |
30% |
70% |
29 to 10 days |
60% |
40% |
9 to 5 days |
80% |
20% |
4 to 2 days |
95% |
5% |
रद्द करण्याची धोरणे:
-
जर कोणत्याही कारणाने आपले येणे रद्द करावे लागत असेल तर आपणास बुकिंग करतेवेळी दिलेली पावती आणि आपला लेखी अर्ज देणे बंदनकारक आहे. अशा वेळेस रद्दबातल शुल्क आकारले जाईल.
-
रद्द करण्याचे शुल्क एकूण टूर खर्चावर मोजले जाईल आणि रद्द करण्याचे शुल्क निर्गमन तारखेच्या आणि रद्द करण्याच्या तारखेवर अवलंबून असेल
-
रद्द करण्याचे शुल्क जसे की रेल्वे आणि विमान कंपनीच्या नियमांनुसार लागू होतील व ते स्वतंत्र कापून घेतले जातील
-
आपले विमान तिकीट जर कंपनीचे विशेष ग्रुप तिकीट मध्ये असेल तर अशी तिकिटे हि नॉन रीफंन्डेबल असतात
-
देय असलेला परतावा हा संबधित विमान कंपनी अथवा इतर अस्थापनेकडून जमा झाल्यानंतरच दिला जाईल
-
देय असलेल्या पर्ताव्यामधून कंपनी प्रक्रिया शुल्क कापून घेते
टुर | टुर प्लॅन |
---|---|
रेल्वे प्रवास – पुणे ते अहमदाबाद व बडोदा ते पुणे
बस प्रवास –स्थलदर्शन सर्वत्र 2 X 2 आरामदायी AC बसने
निवास व्यवस्था –डिलक्स हॉटेल मध्ये स्वतंत्र रूम ( दोघात एक प्रमाणे)