!! नर्मदे हर हर !!

नर्मदा परिक्रमेविषयी थोडक्यात….

श्री टेंबे स्वामी, श्री गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ, श्री रंगावधूत स्वामी, श्री गोंदवले महाराज, श्री बिडकर महाराज अशा अनेक महान विभूतींनी नर्मदा परिक्रमा पायी केली आहे. नर्मदा माईवर श्रद्धा ठेवून हि यात्रा जरूर करावी नर्मदा माई भक्तास नक्कीच अनुभती देईल…नर्मदा हि कुमारी देवी आहे. नर्मदेचा उगम मध्यप्रदेश येथील अमरकंटक येथे झालेला आहे आणि नर्मदा गुजरात मधील भरूच जवळ मिठीतलाई येथे सागराला मिळते. नर्मदा परिक्रमेत नर्मदेची अमरकंटक येथे बाल, भेडाघाट येथे अवखळ व गरुडेश्वर येथे संयमी अशी रूपे पहावयास मिळतात. नर्मदा नदी हि गंगा नदीपेक्षाही पुरातन आणि स्वयंभू आहे.

नर्मदा परिक्रमेची सुरवात हि मार्कंडेय ऋषींनी केली. त्यांनी हि परिक्रमा वाटेतील ९९९ नद्या न ओलांडता ४५ वर्षात पूर्ण केली. परिक्रमा म्हणजे प्रदक्षणा इष्ट देवतेला उजव्या हाताला ठेवून परिक्रमा केली जाते. हि यात्रा शास्त्रोक्त पायी करायची झाल्यास ३ वर्ष ३ महिने १३ दिवस किंवा १ वर्ष १ महिना ११ दिवसांची सांगितली आहे. हि परिक्रमा ६ महिन्यात देखील करता येऊ शकते. परंतु सामान्य माणूस हा गृहस्थाश्रमात अडकलेला असतो, त्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात त्यामुळे इतका वेळ देणे शक्य होत नाही. म्हणून आपण नर्मदा परिक्रमा बसने करतो जेणे करून सर्वांना हि यात्रा करता येते. आपली परिक्रमा ओंकारेश्वर येथून संकल्प पूजन, कुमारिका पूजन आणि पापक्षालन विधीने सुरु होते आणि परत ओंकारेश्वरला आल्यावर संकल्प पूर्तीची पूजा होते. आपला बस प्रवास उज्जैन पासून सुरु होतो आणि इंदोर येथे संपतो. आपण १४ दिवसांमध्ये अंदाजे ३५०० KM प्रवास करतो. दररोज किमान १५० KM ते जास्तीत जास्त ३७५ KM बस प्रवास आपण करतो. सर्वांना झेपेल असाच कार्यक्रम आपण आखला आहे काळजी नसावी परंतु सदर यात्रे मध्ये धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाणे पहायची असल्याकारणाने रोज साधारण २/३ KM चालायची तयारी असायला हवी…यात शाररीक क्षमतेची कसोटी लागते पण मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. नर्मदा परिक्रमा हि माणसामधील मद घालवणारी व इच्छित फळ देणारी यात्रा आहे. नर्मदा मैयाच्या नुसत्या दर्शनाने मोक्षप्राप्ती होते असे म्हणतात. नर्म म्हणजे सुखदायिनी, भौतिक सुखांच्या पलीकडे काय ? याची जाणीव करून देणारी नर्मदा मैया आपल्या बरोबर असल्याची जाणीव यात्रा काळात नक्की होते अर्थात त्यासाठी तेव्हढा श्रद्धाभाव असायला हवा ….चला तर मग अद्भुत मंगलमय परिक्रमेला नर्मदे हर……… हि पोस्ट आपण आपल्या व्हाॅट्स अप ग्रुपला शेअर करा आपल्यामुळे कोणाला तरी प्रेरणा मिळू शकते… श्री नर्मदा माईंच्या कृपेने आणि आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कल्पतरू हॉलीडेज श्री नर्मदा परीक्रमा यात्रेचे आयोजन करत आहे. सदर यात्रा हि जास्तीत जास्त आरामदायी आणि योग्य सुखसुविधेसह आयोजित करत आहोत. आपली यात्रा निश्चितच यशस्वी होईल आपण निश्चिंत रहा….

नर्मदा परिक्रमा – १७ दिवस

Place to visit Inclusion-Exclusion Cancellation & Cost Place to visit

       यात्रेतील दर्शनीय स्थळे

  • ओंकारेश्वर- ज्योतिर्लिंग व श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन, श्री गजानन महाराज मंदिर, परिक्रमासाठी प्रारंभ बिंदू

    रावेरखेडी-गाव जिथे श्री बाजीराव पेशवे यांनी शेवटचा वेळ घालवला आणि त्यांचे निधन झाले.

  • लेपा-भारती ठाकूर यांचा सामाजिक उपक्रम-निमार अभ्युदय ग्रामीण व्यवस्थापन व विकास संघ (नरमाडा)

    बाडवानी – राज घाट, नर्मदा किनारी असलेले एकमुखी दत्त महाराजांचे मंदिर

  • प्रकाश – दक्षिण काशी, केदारेश्वर आणि संगमेश्वर मंदिर (तापी, पुलिंदा आणि गोमती नदीचा त्रिवेणी संगम) म्हणून प्रसिद्ध आहे.

  • शूलपाणीश्वर-शूलपाणीश्वर मंदिर. कुंभेश्वर- कुंभेश्वर महादेवाचे मंदिर, शनिदेव मंदिर.विमलेश्वर-श्री विमलेश्वर आणि रत्नेश्वर महादेव मंदिर

  • मिठीतलाई – नर्मदा नदी अरबी समुद्रास मिळते ते ठिकाण

  • नीळकंठेश्वर- नीळकंठेश्वर महादेव मंदिर, नर्मदा घाट. नरेश्वर- श्री रंगवदुत महाराजांची समाधी (श्री, टेंबे स्वामी यांचे शिष्य)

  • कर्नाली-कुबेरभंडरी मंदिर, नर्मदा घाट

  • गरुडेश्वर- वासुदेवानंद सरस्वति महाराजांची समाधी, श्री दत्त मंदिर, गरुडेश्वर महादेव मंदिर, नर्मदा घाट

  • सरदार सरोवर- नर्मदा नदीवरील धरण 

  • कोटेश्वर – कोटेश्वर महादेव, श्रीराम मंदिर, नर्मदा दर्शन.

  • महेश्वर- महान मराठा राणी राजमाता अहिल्या देवी होळकर, राजवाडा.

  • सहस्त्रधारा-श्री दत्ता धाम, श्री नारायणपूर महाराजांनी बांधलेले श्री दत्त मंदिर, येथे नर्मदा नदी सहस्त्रधारा (हजारो झरे) मध्ये वाहते.

  • मंडलेश्वर- श्री नर्मदा, राम मंदिर, दत्त मंदिर, श्री टेंबे स्वामींच्या लेण्या, तत्त्वज्ञानी मंदाना मीरा आणि आद्य गुरु शंकराचार्य यांनी येथील गुप्तेश्वर महादेव मंदिरात वादविवाद केले.

  • उज्जैन – महाकालेश्वर मंदिर (ज्योतिर्लिंग), भैरवनाथ मंदिर

  • नेमावार – नर्मदा नदी चे नाभी स्थान (मूळ बिंदू अमरकंटक ते बंगालच्या उपसागरापर्यंत होळी नर्मदाचा मध्य बिंदू), प्रसिद्ध सिद्धनाथ शिवलिंग मंदिर

  • जबलपूर- ग्वारी घाट

  • अमरकंटक – विंध्या व सातपुडा पर्वतरांगा . नर्मदा नदीचा उउगम स्थान . जलेश्वर महादेव मंदिर, धबधबे, बाग (माई बागिचा )

  • महाराजपूर- श्री नर्मदा व बंजार नदीचा संगम बिंदू. होशंगाबाद-श्री दत्त मंदिर, शेठाणी घाट

Inclusion-Exclusion

समावेश

1.  जाता येतानाची सेकंड क्लासचे रेल्वे तिकिट भाडे.*

2. डिलक्स हॉटेल मध्ये स्वतंत्र रूम ( दोघात एक प्रमाणे )

3. रूम मध्ये तिसरा सभासद प्रौढ / मुल असल्यास लागणारा अतिरिक्त बेड हा ज्या प्रमाणे सहल खर्च दिला असेल त्या प्रमाणे

4. 2 X 2 AC अथवा NON AC बसने स्थलदर्शन

5. भोजन व्यवस्था सहलीच्या कार्यक्रमानुसार सहल खर्चामध्ये समाविष्ट

6. ग्रुप लीडर तसेच महत्वाचे ठिकाणी गाईड खर्च समाविष्ट

7. पुणे / मुंबई येथून जाताना अथवा येताना वगळता हमाली खर्च

 

वगळण्यात आलेल्या गोष्टी 

१  विमान प्रवास भाडे तसेच रेल्वे / विमान प्रवासादरम्यान लागणार भोजन खर्च

2. पर्यायी पर्यटन स्थळे

3.  प्रवेश शुल्क तसेच तेथील बोटिंग खर्च अथवा आपल्या सोयीसाठी केलेल्या रिक्षा अथवा तत्सम वाहनाचा खर्च

4. रेल्वे प्रवासातील वरील वर्गाची तिकिटे हवी असल्यास अथवा हॉटेल मध्ये रूम अपग्रेड घेतल्यास येणार खर्च

5.  विमा खर्च समाविष्ट नाही

6.  शासकीय यंत्रणेकडून लागू झालेले नवे कर


तसेच सहलीत सहभागी होण्यापूर्वी आपण संपूर्ण नियम व अटी वाचूनच बुकिंग केले आहे व ते आपणास मान्य आहेत असे समजण्यात येईल. आपण देखील पूर्ण माहिती घेऊनच बुकिंग करावे हि नम्र विनंती. जेणे करून नंतर गैरसमज राहू नयेत व सहल / यात्रेचा आनंद घेता यावा हाच त्यामागील मुख्य हेतू.

Cancellation & Cost

Days upto

Cancellation

Refund

89 to 60 days

10%

90%

59 to 30 days

30%

70%

29 to 10 days

60%

40%

9 to 5 days

80%

20%

4 to 2 days

95%

5%

 

रद्द करण्याची धोरणे:

  • जर कोणत्याही कारणाने आपले येणे रद्द करावे लागत असेल तर आपणास बुकिंग करतेवेळी दिलेली पावती आणि आपला लेखी अर्ज देणे बंदनकारक आहे. अशा वेळेस रद्दबातल शुल्क आकारले जाईल.

  • रद्द करण्याचे शुल्क एकूण टूर खर्चावर मोजले जाईल आणि रद्द करण्याचे शुल्क निर्गमन तारखेच्या आणि रद्द करण्याच्या तारखेवर अवलंबून असेल

  • रद्द करण्याचे शुल्क जसे की रेल्वे आणि विमान कंपनीच्या नियमांनुसार लागू होतील व ते स्वतंत्र कापून घेतले जातील

  • आपले विमान तिकीट जर कंपनीचे विशेष ग्रुप तिकीट मध्ये असेल तर अशी तिकिटे हि नॉन रीफंन्डेबल असतात

  • देय असलेला परतावा हा संबधित विमान कंपनी अथवा इतर अस्थापनेकडून जमा झाल्यानंतरच दिला जाईल

  • देय असलेल्या पर्ताव्यामधून कंपनी प्रक्रिया शुल्क कापून घेते

     टुर टुर प्लॅन
   
   
   
   
   
   
new
WhatsApp Image 2020-10-24 at 20.13.44
WhatsApp Image 2020-11-09 at 06.58.42
WhatsApp Image 2019-12-27 at 22.50.36

रेल्वे प्रवास –  पुणे – उज्जैन व इंदोर – पुणे

बस प्रवास – सर्वत्र स्थलदर्शन 2 X 2 आरामदायी AC बसने

बोट प्रवास – विमलेश्वर ते मिठीतालाई अंदाजे ४ तासाचा बोट प्रवास पूर्णपणे हवामानावर अवलंबून असतो

निवास व्यवस्था –डिलक्स हॉटेल मध्ये स्वतंत्र रूम ( दोघात एक प्रमाणे)

भोजन व्यवस्था –  भोजन व्यवस्था  रेल्वे प्रवास सोडून आमचे बल्लवाचार्य यांनी बनवलेले ( ३ वेळा चहा / कॉफी,२ वेळा शाकाहारी भोजन,१ नाश्ता ) रोज १ मीनरल वाॅटर बोटल